Sunday, August 16, 2026
HomeसाताराSatara Lok Sabha Result : उदयनराजे विजयी; अटीतटीच्या लढतीत शशिकांत शिंदेंचा पराभव

Satara Lok Sabha Result : उदयनराजे विजयी; अटीतटीच्या लढतीत शशिकांत शिंदेंचा पराभव

Satara Lok Sabha Result : उदयनराजे विजयी; अटीतटीच्या लढतीत शशिकांत शिंदेंचा पराभव

[ad_1]








सातारा : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त काबीज केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांचा त्यांनी सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला.

प्रारंभी पोस्टल मतदान मोजणीसाठी घेण्यात आले. मात्र, हा कौल उदयनराजेंच्या विरोधात गेला होता. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी मताधिक्य घ्यायला सुरूवात केली. काही फेर्‍यांमध्ये त्यांनी आघाडी घेतली होती. मात्र, दुपारनंतर खा. उदयनराजेंनी मताधिक्य घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. ही आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. त्यांच्या विजयाचा वारु अखेरपर्यंत आ. शशिकांत शिंदे यांना रोखता आला नाही. उदयनराजे विजयी होताच राजधानी सातार्‍यात जल्लोषाला सुरूवात झाली. राजेंच्या मावळ्यांनी फटाके फोडले, गुलाल उधळला. राजधानीत राजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार रॅली काढत विजय साजरा केला.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments