‘अमूल’ ब्रँडअंतर्गत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करणाऱ्या जीसीएमएमएफचे एमडी जयेन मेहता म्हणाले की, वाढीव उत्पादन खर्चाची भरपाई करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक आहे. ताज्या दरवाढीमुळे ५०० मिली अमूल म्हशीचे दूध, ५०० मिली अमूल गोल्ड दूध आणि ५०० मिली अमूल शक्ती दुधाचे सुधारित दर अनुक्रमे ३६ रुपये, ३३ रुपये आणि ३० रुपये झाले आहेत.








