
या बाबत गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या अधिकाऱ्यांनी अपघातापूर्वी अल्पवयीन मुलाचे लोकेशन, ब्लॅक आणि कोसी पबमध्ये त्याची उपस्थिती, पोर्श चालविणे, अपघाताचा तपशील, पुराव्यांशी छेडछाड, रक्ताचे नमुने गोळा करणे आणि वैद्यकीय चाचण्यांबद्दल विचारणा केली. या सर्व प्रश्नांचे उत्तर अल्पवयीन मुलाकडे एकच होते – तो मद्यधुंद असल्याने त्याला कशाचीही आठवण नव्हती,” अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या मित्रांनी दोन पबमध्ये मद्यपान केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून तेथे त्यांचे एकूण ४८ हजार रुपयांचे बिल होते.





