Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi | PM नरेंद्र मोदी करणार तब्बल 45 तास ध्यानधारणा...

PM Narendra Modi | PM नरेंद्र मोदी करणार तब्बल 45 तास ध्यानधारणा ; रॉक मेमोरियलमधील Video आली समोर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

PM नरेंद्र मोदी करणार तब्बल 45 तास ध्यानधारणा ; रॉक मेमोरियलमधील Video आली समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या धामधुमीनंतर ध्यानधारणा करण्यास सुरुवात केली आहे. रॉक मेमोरियल येथे 45 तास ध्यानास बसणार आहे.

कन्याकुमारी : लोकसभा निवडणूकीचे उद्याचे शेवटच्या सातव्य टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मागील दीड महिन्यांपासून देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला होता. एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी चुरशीची लढत सर्वत्र दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी आणि 400 चा आकडा पार करण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला. नरेंद्र मोदी यांनी देखील देशभर दौरे करत सभांचा सपाटा लावला होता. या प्रचाराच्या धामधुमीनंतर नरेंद्र मोदी हे ध्यानधारणेला बसले आहेत.

भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल (दि.30) कन्याकुमारीला रवाना झाले. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ‘रॉक मेमोरियल’ या स्मारक स्थळाला त्यांनी भेट देत ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. काल सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानधारणेला बसले आहेत. मोदींची ही ध्यानधारणा अवघ्या काही तासांची नसून तब्बल 45 तासांची असणार आहे. जवळजवळ दोन दिवस नरेंद्र मोदी हे ध्यानाला बसणार आहेत. त्याचबरोबर 45 तास त्यांचे मौन देखील पाळणार आहेत. या संपूर्ण 45 तासांच्या ध्यानधारणेमध्ये मोदी कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण करणार नसल्याचे देखील भाजप नेत्यांकडून सांगण्यात येणार आहे. संपूर्ण ध्यानधारणा नरेंद्र मोदी लिक्विट डाईटवर करणार आहेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments