[ad_1]
दरम्यान सुमारे ७०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी पाहिलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर जसेच्या तसे आता अनुभवायला मिळणार आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे खूप जूने, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पुरातत्वीय महत्व असणारे मंदिर आहे. मात्र, यामध्ये काळाच्या ओघात नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे अनेक बदल झाले होते. याच मंदिराला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. हे काम सुरू असतानाच मंदिरात हे तळघर आढळून आलं आहे.
[ad_2]
Source link
