
वाढत्या उष्णतेमुळे मालगाडीचा लोको पायलट बेशुद्ध झाल्याचे समोर आले. कारण रेल्वे इंजिनमधील तापमान 55 अंशांवर पोहोचले होते. त्यातच 9 तासांच्या सततच्या ड्युटीनंतर लोको पायलटला चक्कर येऊन धावत्या ट्रेनमध्येच बेशुद्ध झाल्याचा प्रकार समोर आला.
देशात सध्या तीव्र उष्णतेचे वारे वाहत आहे. अनेक शहरांमधील तापमान 45 अंशांवर गेले आहे. या उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील तापमान ४७ अंशांच्या पुढे गेले आहे. अशातच उष्णतेच्या लाटेमुळे उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील मालगाडीच्या लोको पायलटची प्रकृती खालावल्याचे समोर आले. कारण रेल्वेच्या इंजिनमधील तापमान 55 अंशांच्या आसपास पोहोचले होते. शिवाय, सतत 9 तासांच्या ड्युटीमुळे लोको पायलटला मळमळ आणि चक्कर येऊ लागली. त्यामुळे तो बेशुद्ध ही पडला, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
या घटनेची
माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून लोको पायलटला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोको पायलटची तब्येत अचानक बिघडल्याने मालगाडी सुमारे अडीच तास महोबा स्थानकावर उभी होती. दुसरा लोको पायलट आल्यानंतर मालगाडी महोबा ते बांदा येथे पाठवता आली.









