Wednesday, October 14, 2026
Homeदेश-विदेशAmit Shah  | भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्र्यांनी सांगितली टाइमलाइन |...

Amit Shah  | भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्र्यांनी सांगितली टाइमलाइन | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्र्यांनी सांगितली टाइमलाइन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका असलेल्या नक्षलवादाच्या खात्माबाबत मोठा दावा केला आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशातील नक्षलवादाची समस्या संपुष्टात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका असलेल्या नक्षलवादाच्या खात्माबाबत मोठा दावा केला आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशातील नक्षलवादाची समस्या संपुष्टात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. छत्तीसगडचा एक छोटा भाग वगळता संपूर्ण देश या धोक्यापासून मुक्त झाला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

पशुपतीनाथ ते तिरुपती या तथाकथित नक्षल कॉरिडॉरमध्ये माओवाद्यांची उपस्थिती नसल्याचेही शाह यांनी एका मुलाखतीत सांगितले. तसेच ‘देशातून नक्षलवाद संपत आहे. कधीकाळी काही लोक पशुपतीनाथ ते तिरुपती या नक्षल कॉरिडॉरबद्दल बोलत असत. आता झारखंड पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे. बिहार पूर्णपणे मुक्त झाला. ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशही पूर्णपणे मुक्त झाले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशही पूर्णपणे मुक्त झाल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments