
[ad_1]
Prajwal Revanna Sex Scandle Case : कर्नाटकमधील प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. प्रज्ज्वल रेवण्णांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप होताच, त्यांनी भारतातून पळ काढला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात अद्यापही चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता प्रज्ज्वल रेवण्णांचे आजोब आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पत्राद्वारे प्रज्ज्वल रेवण्णा यांना इशारा दिला आहे. तू जिथे कुठे असशील तिथून भारतात परत ये, अन्यथा तुला आमच्या रोषाचा सामना करावा लागेल, असे ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर त्यांनी हे पत्र पोस्ट केलं आहे.
माजी पंतप्रधान देवेगौडांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“सद्यस्थितीत मी फक्त एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे त्याला ( प्रज्वल रेवण्णा ) भारतात येण्यास सांगू शकतो. मी त्याला आवाहन करत नाही. तर थेट इशारा देतो आहे की तो जिथे कुठे असेल, त्याने भारतात यावं आणि पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं. जर त्याने माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, तर त्याला माझ्या आणि कुटुंबियांच्या रोषाचा सामना करावा लागेल. जर त्याच्या मनात माझ्याविषयी थोडा तरी आदर असेल, तर त्यांनी लगेच भारतात परत यावं, असं देवेगौडा यांनी पत्रात म्हटलं आहे.”, असं देवेगौडा यांनी पत्रात म्हटलं आहे.
[ad_2]
Source link

