
Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना जामीन मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही वेळापूर्वीच कारागृहातून बाहेर आले आहेत. उद्या ते पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहेत.
नवी दिल्ली : अरविंद केजरीवालांना अखेर जामीन मिळाला. तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हुकूमशाही संपेल, जनता न्याय देईल, असे त्यांनी म्हटले आहे. तुमच्यामध्ये राहून बरे वाटते. मी म्हणालो होतो की मी लवकरच येईन, मी तुमच्यामध्ये आलो. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत यावेळी त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल, मुलगी हर्षिता आणि आपचे राज्यसभा सदस्य संदीप पाठकही उपस्थित होते.
करोडो लोकांनी दिले आशीर्वाद









