
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ‘ललित प्रभाकर.’ या मालिकेतील ललित आणि प्राजक्ता माळीची जोडी तुफान हिट ठरली होती. ललितने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याची प्रत्येक भूमिका ही कायमच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडताना दिसली. सध्या ललित एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.








