Thursday, August 27, 2026
Homeसातारावंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बारस्कर ह प्रचार दौऱ्यासाठी फलटण येथे

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बारस्कर ह प्रचार दौऱ्यासाठी फलटण येथे

फलटण : माढा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व म हा विकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे असून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे रमेश बारस्कर हे आहेत रमेश बारस्कर हे फलटण येथे आले होते .


माढा लोकसभा मतदारसंघातील महायुती तसेच महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे भाजपचे असल्याचे सूचक विधान माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बारस्कर यांनी केले, ते माढा लोकसभा मतदार संघातील प्रचार दौऱ्यात फलटण येथे असताना         यावेळी बोलताना पुढे रमेश बारस्कर म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. या सभांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघणार असल्याचे बारस्कर म्हणाले. तर त्याचबरोबर या मतदारसंघांमध्ये युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याही सभेचे आयोजन करणार असल्याची माहिती रमेश बारस्कर यांनी दिली. महायुती व महाविकास आघाडी मधील समोर दोन उमेदवार असले तरी दोन्ही उमेदवार भाजप पक्षामधील असल्याने मतदारांनी आपल्या सोबत येत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन यावेळी रमेश बारस्कर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments