Maharashtra weather update: राज्यातील मतदानावर अवकाळीचं सावट! बुलढाणा, अमरावतीसह ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

0
17
Maharashtra weather update: राज्यातील मतदानावर अवकाळीचं सावट! बुलढाणा, अमरावतीसह ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता


Maharashtra weather update : राज्यात विदर्भात ५ तर मराठवड्यातील ३ जिल्ह्यात मतदान होत आहे. मात्र, या मतदानावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, येथे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होऊन वादळी वाऱ्यासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Source link