Maharashtra Weather Update: मुंबई पुण्यात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा; असे असेल आजचे हवामान

0
14
Maharashtra Weather Update: मुंबई पुण्यात उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा; असे असेल आजचे हवामान


Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमान वाढ तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना आणि वीजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात उष्णतेची लाट तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे २८ एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



Source link