Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशAnant Ambani-Radhika Merchant Wedding : 529 कोटींच्या आलिशान घरात घेणार अनंत -...

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : 529 कोटींच्या आलिशान घरात घेणार अनंत – राधिका सप्तपदी, जेम्स बाँड व ब्रिटनच्या राणीचं कनेक्शन

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : 529 कोटींच्या आलिशान घरात घेणार अनंत – राधिका सप्तपदी, जेम्स बाँड व ब्रिटनच्या राणीचं कनेक्शन

[ad_1]

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : आशियातील सर्वात श्रीमंत आणि उद्योगजगतातील सर्वात मोठं नाव मुकेश धिरुभाई अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लग्नघाई आहे हे सर्वांचं माहिती आहे. या कुटुंबात जो काही सोहळ्या असतो अद्वितीय आणि भव्य असतो. शिवाय तो संस्कृतीशी जोडलेला असतो. मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न राधिका मर्चंट हिच्याशी होणार आहे. (Anant Ambani Radhika Merchant Wedding luxurious hotel worth 529 crores stoke park estate london july 2024)

जामनगरमध्ये तीन दिवस प्री वेडिंग सेलिब्रेशन केल्यानंतर अनंत आणि राधिका यांचं लग्न कुठे होणार यांची सर्वांना उत्सुकता होती. अंबानी कुटुंबांचे सर्व सोहळे हे भव्यदिव्य असतात. या कुटुंबातील सोहळ्यात उद्योग जगतातीलच नाही तर विदेशातील सेलिब्रिटी, गायक, खेळाडूसह बॉलिवूडमधील प्रत्येक व्यक्ती उपस्थित असतो. एवढंच नाही तर राजकारणातील नेते मंडळीही आवर्जून या सोहळ्याला उपस्थित राहतात. जुलै महिन्यात अनंत राधिका हे कुठे सप्तपदी घेणार आहे या स्थळाबद्दल माहिती समोर आली आहे. 

इथं होणार ग्रँड वेडिंग!

मुंबई ते जामनगर आणि आता दुबई ते अमेरिका असा हा लग्न सोहळा असणार आहे. जेम्स बाँडशी खास कनेक्शन असलेल्या लंडनमधील स्टोक्स पार्क इस्टेटमध्ये जुलै महिन्यात विवाह सोहळा होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार 2021 मध्ये मुकेश अंबानी यांनी ही मालमत्ता अनंतसाठी खरेदी केली आहे. 

300 एकरवर पसरलेले हे 529 कोटींच्या आलिशान घर 1066 मध्ये बांधलं गेलंय. त्यानंतर 1760 मध्ये या आलिशान घराचा विस्तार झाला. या घरात 49 आलिशान खोल्या तलाव, उद्यान, स्मारके, स्पा, क्लब हाऊस, रेस्टॉरंट, जिम फिटनेस सेंटर, टेनिस कोर्ट, गोल्फ कोर्स इत्यादी गोष्टी आहेत. ब्रिटनमधील सर्वात महागड्या मालमत्तापैकी ती एक आहे. 

जेम्स बाँड व ब्रिटनच्या राणीचं कनेक्शन  

स्टोक पार्क इस्टेट हे ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ I चं घर होतं. 1908 नंतर ते कंट्री क्लबमध्ये रूपांतरित करण्यात आलं. हा ब्रिटनमधील सर्वात जुना कंट्री क्लब असून इथे जेम्स बाँडचे शूटिंग झालं होतं. तर अबू धाबी मध्ये लग्नाचा संगीत सोहळा होणार आहे. 

‘या’ सेलिब्रिटींना निमंत्रण

नीता अंबानी स्वतः आपल्या धाकट्या मुलाचं लग्न संस्मरणीय बनवण्याच्या जोरदार तयारीत लागली आहे. IPLचं वेळापत्रक सांभाळात त्या लग्नाची तयारी करत आहेत. विवाह सोहळ्यासाठी ड्रेस कोड असून या लग्नाची पत्रिकाही खास आहे.  9 पानांचे निमंत्रण पत्रिका बॉलिवूड स्टार्स आणि पाहुण्यांच्या घरी पोहोचवली जाते आहे. कारण या फंक्शनच्या वेळापत्रकानुसार बॉलिवूड स्टार्स आणि दिग्गज आपले वेळापत्रक ठरवतील. अंबानी कुटुंबाच्या लग्न समारंभातील पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान, सलमान खान, बच्चन फॅमिली, रणवीर, दिपका, विराट कोहली, कतरिना कैफसह अनेक बड्या स्टार्सची नावं असल्याचा मीडिया रिपोर्टंमध्ये सांगण्यात आलंय. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments