Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रडॉ बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या बांधवांना सन 2024 च्या भिमस्फूर्ती पुरकाराने गौरविण्यात आले.

फलटणःआंबेडकर हाऊस लंडनमध्ये भिमस्फूर्ती पुरस्कार लंडन (१४एप्रिल)- डॉ बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या बांधवांना सन 2024 च्या भिमस्फूर्ती पुरकाराने गौरविण्यात आले.

शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेताना अडचण येणार नाही याची काळजी घेत, समाजाचे भविष्य जोपासणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांची आज गरज आहे. म्हणून हा पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम “प्राँब्लम आँफ रुपी” या शोध निबंधाच्या शतोकोत्सव वर्षात बाबासाहेबांच्या “आंबेडकर हाऊस लंडन” येथे साजरा करीत असल्याची माहिती आयोजक प्रबुद्ध सिद्धार्थ यांनी दिली.

●भीमस्फूर्ति पुरस्काराचे हे १४ वे वर्ष असून परदेशात, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील निवासस्थानी हा कार्यक्रम साजरा झाला.

सन २०२४ च्या भीमस्फूर्ति पुरस्काराचे मानकरी:

  1. शारदा तांबे : जेष्ठ कार्यकर्त्या लंडन
  2. प्रा.त्रिशिला वसंत गायकवाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संशोधन समिती
  3. अभय डोंगरे : जनरल मॅनेजर ओएनजीसी
  4. प्रा.अजय ढवळे : संशोधक
  5. वतनकुमार कांबळे : निवृत्त सनदी अधिकारी
  6. सुजाता कांबळे : सामाजिक कार्यकर्त्या
  7. पिंकी डोंगरे : सामाजिक कार्यकर्त्या
    यांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला

● आंबेडकरी प्रजा परिषदेत दरवर्षी देण्यात येणारा भीमस्फूर्ति पुरस्कार या वर्षी 14 एप्रिल भीमजयंती दिनी उत्साह पुर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी इंग्लंड येथील वंदना अपरांती, चमन विरदी, श्रीकांत बोरकर, रणजित बौद्ध यांसह लीड्स, कार्डिफ, बरहींगम, लेस्टर येथील आंबेडकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

●कार्यक्रमाचे नियोजन प्रबुद्ध इंटरनँशनल, डॉ बाबासाहेब आंबेडकर इग्नायटेड मिशन(AIM), व BAVPM ने केले.

●उपस्थितांचे स्वागत व आभार मिलिंद अहिवळे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments