
वयाच्या १४ व्या वर्षीच ध्येय केले निश्चित –
वृषालीने सांगितले की, तिने आठवीत असतानाच आय.ए.एस. होण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यामुळे तिने माध्यमिक शिक्षण घेत असतानाच सामान्य ज्ञानाची पुस्तके वाचण्यास सुरूवात केली. तिला दहावीला व बारावीच्या बोर्ड परीक्षेत ९० टक्केहून अधिक गुण मिळूनही तिने इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घेतला नाही. तर तिने आपले आयएएसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कला शाखेत प्रवेश घेऊन राज्यशास्त्रातून पदवी संपादन केली. हा विषय घेऊनच ती आता आयएएस झाली आहे.





