Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हाती सत्ता द्या, बदल करुन दाखवतो : प्रकाश आंबेडकर

माझ्या हाती सत्ता द्या, बदल करुन दाखवतो : प्रकाश आंबेडकर

फलटण : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब  आंबेडकर हे पाहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या  प्रचार वेळी म्हणाले की बदल करण्यासाठी मला निवडून द्या, राज्यात आणि देशात बदल घडून दाखवतो, असा विश्वास ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. ते रिसोड-मालेगाव क्षेत्रात डोंगरकिन्ही येथे संवाद मेळाव्यात बोलत होते.

आंबेडकर म्हणाले की, अजूनही शेतमालाच्या हमीभावाचा कायदा झाला नाही, हा कायदा झाला तर खरेदी करणाऱ्या सर्व कंपनीविरोधात कारवाई करता येईल. आपल्याला मान्य असेल त्या भावात आपल्याला माल विकता येईल. प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली आहेत. या पुढे आंबेडकर म्हणाले की, अंडी, दूध, तूप बाहेरील राज्यातून आयात करत असल्यामुळे वाशीम आणि अकोल्यातील नागरिकांना बाहेर गावी कामाला जावे लागत आहे.

तसेच, पाऊस भरपूर होत असला तरी साठवणीसाठी पर्याप्त धरण नाहीत. त्यामुळे उन्हाळा येईपर्यंत फक्त २०% पाणी शिल्लक राहत आहे. म्हणून हा बदल करण्यासाठी मला निवडून द्या, राज्यात आणि देशात बदल घडून दाखवतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments