
सोलापूर येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत माढा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला आहे . यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे , जयकुमार गोरे , शहाजीबापू पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती . तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते यांनी संयुक्त रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . यावेळी रॅलीची सांगता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने झाली
यावेळी ची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे . ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा . विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी नरेंद्र मोदीच्या पारड्यात मोठया संख्येने मतांचे दान टाका असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथील सभेत व्यक्त केले माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सोलापूर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी सोलापूरचे माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आमदार सुभाष देशमुख आ . विजयकुमार देशमुख आ बबनदादा शिंदे आ बबनदादा शिंदे आ संजय शिंदे आ समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आदी मंचावर उपस्थित होते
मागच्या 10 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनली आहे. अर्थव्यवस्था मजबूत असेल तरच पायाभूत सुविधा विकास आणि विशेषत्वाने गरीब कल्याणाचा अजेंडा प्रभावीपणे राबवता येतो असे श्री. फडणवीस म्हणाले. काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधांसाठी केवळ एक लाख कोटी खर्च व्हायचा मात्र मोदी सरकारच्या काळात 13 लाख कोटी खर्च करून सर्वांगीण विकास साधला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भ्रष्टाचाराला पायबंद घालून गोरगरीबांचा हक्काचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर खा.निंबाळकर व आ. सातपुते य महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.





