सोपारा स्तूप येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित : सम्यक सांस्कृतिक संघ

0
20
सोपारा स्तूप येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित : सम्यक सांस्कृतिक संघ

फलटण :सम्यक सांस्कृतिक संघाच्या वतीने चैत्र शुक्ल अष्टमी दि १६ एप्रिल २०२४ रोजी मंगळवारी सकाळी ठीक १०.३० वाजता, स्थळ : सोपारा स्तूप येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते प्रा आनंद देवडेकर संपादक सद्धम पत्रिका, केद्रीय कार्याध्यक्ष अपरांत साहित्य कला प्रबोधिनी तसेच अशोक तपासे लेखक विचारवंत , बाळासाहेब थोगात लेखक विचारवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्यक सांस्कृतिक संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

सम्यक संबुध्द यांचे भिक्षापात्र जिथे स्थापित करून अपरांतात पहिल्यांदाच बुध्द धम्माचा प्रचार प्रसार करण्यात आला, जिथून प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे सुपुत्र महेंद्र हे ताम्रपर्णीला ( श्रीलंका ) बुध्द धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी निघून गेले व कायमचे त्या मातीत विलीन झाले, जाण्या आधी शेवटचे ज्या स्तूपाला वंदन केले त्या स्तूपाच्या छायेतून सार्वभौम जंबुद्विपाच्या महान सुपुत्राची प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२८ वी जयंती आपण अष्टमीला दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता नालासोपारा इथल्या गास गावा जवळच्या स्तूपावर  साजरी उल्हासात करण्यात,

आजच्या चैत्र शुक्ल अष्टमीच्या मंगल दिनी सोपाराच्या पावन भूमीतून सार्वभौम जंबुद्विपाचे महान सुपुत्र देवान पिय पियदसि सम्राट असोक यांची २३२८ वी जयंती त्यांची प्रांतिक राजधानी असलेल्या सुपारक इथून मोठ्याप्रमाणात हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली, महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज वक्तयांनी सम्राट अशोक यांच्या इतिहासला उजाळा दिला, ख्यातनाम दिग्गज वक्ते प्रा आनंद देवडेकर सर मा. बाबासाहेब थोरात सर मा. अशोक तपासे सर तसेच नामवंत लेखक संजय सावंत सर अशी एकाहून एक सरस वक्ते आज सोपारा स्तूपवर उपस्थित होते खरंतर आज सोपारा स्तूपावर अभ्यासकांची विचारवंतांची नामवंतांची रेलचेल मोठ्याप्रमाणात होती.
सम्यक सांस्कृतिक संघ व पाली रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेकांनी उपस्थित दर्शवली होती त्या सर्वांचे मनापासून आभार…!

सूरज जगताप