Thursday, August 27, 2026
Homeब्लॉगमथुरा शैलीतील बौध्दिसत्वांची मूर्ती !

मथुरा शैलीतील बौध्दिसत्वांची मूर्ती !

फलटणःबौध्दिसत्वांची भग्न मूर्ती जर आपण निरखून पाहीली तर तिच्यातील प्रमाणबद्धता आपल्याला आज देखील आवाका करून सोडते.
खंडित असतांना देखील तिच्यातील सौंदर्य तसूभरही कमी झाले नाही.
प्राचीन काळी मथुरा शैलीत लाल वालुकामय दगडाचा वापर मूर्ती तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात केला जात असे.
बौध्दिसत्वांच्या खंडीत मूर्तीने आपल्या डोक्यावर मुकूट परिधान केले असून त्यावर अतिशय नाजुक पध्दतीने नक्षीकाम केले आहे जणू काही ते सुवर्ण अलंकारच आहेत येवढ्या सुक्ष्म पध्दतीने त्यावर काम केले आहे तर लांब खांद्यावर रुळणारे कुरळे केस अतिशय प्रमाणबद्ध पध्दतीने दोन्ही बाजूला कोरले आहेत त्यातच चेहर्‍यावरची सात्विकात आपल्या मनाचा ठाव घ्यायला पुरेशी आहे.
अर्धलोम स्थितील डोळे लयदार भुवया सडसडीत सरळ नाक धनुष्याकृती नाजुक ओठ , गळ्यातील कंठा, माळा मध्यम शरीरयष्टीच्या स्थितप्रज्ञ अवस्थेतील बौध्दिसत्वांच्या मूर्ती आज देखील किती उच्चतम आणि पराकोटीची कलाकृती आपल्या समोर प्रकट करते.

एक क्षण मनात विचार डोकावतो की छिन्नविछिन्न भग्न करायला एक जोरदार हातोड्याचा घाव पुरेसा आहे… पण मूर्ती घडवणारे हात किती संतुलित एक एक छिन्नी होड्याचा फटका श्वास रोखून मारत असणार मूर्ती घडवणारा कलाकार मनाची एकाग्रता जराही ढळू न देता एक एक प्रमाणबद्ध नाजुक फटका मारत असेल की एकही अधिकचा दगडाचा टवका उडू नये अन्यथा संपूर्ण कलाकृती बिघडून जाण्यास कारणीभूत ठरू शकेल.
आज कितीही संसाधने असली तरी इतकी उच्चतम प्रतीची कलाकृती घडवणे अशक्यप्राय आहे….!

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments