Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशSwiggy डिलिव्हरी बॉयने आजुबाजूला पाहिलं अन् घराबाहेरच...; CCTV त झाला कैद; कंपनी...

Swiggy डिलिव्हरी बॉयने आजुबाजूला पाहिलं अन् घराबाहेरच…; CCTV त झाला कैद; कंपनी म्हणते ‘चांगल्या…’

Swiggy डिलिव्हरी बॉयने आजुबाजूला पाहिलं अन् घराबाहेरच…; CCTV त झाला कैद; कंपनी म्हणते ‘चांगल्या…’

[ad_1]

Viral Video: स्विग्गीच्या इंस्टामार्ट डिलिव्हरी एजंटने ग्राहकाचे घराबाहेर ठेवलेले शूज चोरल्याची घटना समोर आली आहे. डिलिव्हरी एंजट सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघड झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यानंतर नेटकरी त्याच्यावर व्यक्त होत आहेत. व्हिडीओत डिलिव्हरी एजंट पॅकेज घेऊन आल्यानंतर, जाताना शूज उचलून घेऊन जाताना दिसत आहे. 

डिलिव्हरी एजंट आधी बेल वाजवतो आणि नंतर ग्राहक दरवाजा उघडण्याची वाट पाहतो. यादरम्यान तो आजुबाजूचा परिसर न्याहाळताना दिसत आहे. त्याने खाली पाहिलं असता शूजच्या 3 जोड्या बाहेर ठेवलेल्या होत्या. यानंतर एका मिनिटात कोणीतरी दरवाजा उघडतं आणि पॅकेज घेतं. 

पॅकेज दिल्यानंतर एजंट काही वेळ मोबाइल पाहतो आणि त्यानंतर दरवाजापासून दूर जातो. पण यावेळी त्याचं सर्व लक्ष दरवाजाकडे होतं. यावेळी तो आपल्या गळ्याभोवती असलेला कपडा काढून तोंड पुसतो. काही पायऱ्या उतरुन तो खालीही जातो. पण काही सेकंदाने तो दबक्या पावलांनी पुन्हा घऱाबाहेर येतो आणि शूज उचलतो. हे शूज तो आपल्या गळ्यातील कपड्यात लपवून निघून जातो. 

एका एक्स युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “स्विग्गीची पिक-अप आणि ड्रॉप सेवा. डिलिव्हरी बॉयने माझ्या मित्राचे शूज ((@Nike) नेले आणि त्यांनी साधा त्याचा संपर्क क्रमांकही शेअर केला आहे”.

11 एप्रिल 2024 ला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 716K व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंटमध्ये एकाने ही घटना गुरुग्राममध्ये झाल्याचं सांगितलं आहे. स्विग्गीच्या अधिकृत एक्स हँडलवरुनही यावर कमेंट करण्यात आली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “रोहित, आम्ही चांगल्या डिलिव्हरी पार्टनरची अपेक्षा करतो. आम्हाला डीएम करा. जेणेकरुन मदत करु शकतो”.

दरम्यान या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून, आपलेही अनुभव शेअर केले आहेत. तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का?



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments