फलटण शहरात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या ११ एप्रिल २०२४ रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत असलेल्या जयंती महोत्सव

0
20
फलटण शहरात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या ११ एप्रिल २०२४ रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत असलेल्या जयंती महोत्सव

फलटणःआज फलटण शहरात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची ११ एप्रिल २०२४ रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत असलेल्या जयंती महोत्सव . महात्मा फुले चौकात आज गुरुवार दि ११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता जयंती महोत्सवाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले जाणार आहे .

त्यानंतर सकाळी ८.३० वाजता फलटणच्या प्रमुख मार्गांवरून बाईक रॅली काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकातून होणार आहे. ही रॅली क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक – महात्मा गांधी चौक- राम मंदिर- पाचबत्ती चौक, बारामती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक- नाना पाटील चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अहिल्याबाई होळकर चौक – बाणगंगा नदी पलिकडे – सावित्रीबाई फुले चौक फलटण ग्रामिण पोलिस स्टेशन- मारवाड पेठ रोड – जैन मंदिर क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले चौक येथे समाप्त होईल.

त्यानंतर सकाळी ११ वाजता शासकीय सेवेमध्ये निवड झालेल्या समाजातील युवक युवतींचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे. तर सायंकाळी 5 वाजता फलटण शहरातून भव्य दिव्य मिरवणूक सुरू होणार आहे.

सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत या ठिकाणी अल्पोउपहाराची सोय करण्यात येणार आहे. तरी सर्व फुले प्रेमींनी बहुसंख्येने या कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.