
पुणे : काव्य मित्र संस्था पिंपरी चिंचवड द्वारे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा व परिवर्तनवादी कवितांच्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मान्यवरांचे आगमन झाले नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व ग्रंथ पुजेन करण्यात आले व स्वागतगीत घेण्यात आले . त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला, त्यानंतर संत गाडगे महाराज काव्यमय जीवनगाथा या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले . याठिकाणी उपस्थितीत असणारे निमंत्रित कविचे काव्यवाचन झाले उपस्थितीत मान्यवरांचे मनोगत झाली यामध्ये शाहिर ह भ. प भिमाजी महाराज ढोंगीर ( रचनाकार संत गाडगे महाराज जीवनगाथा ) मनिषा फुले ( सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व इतर मागास , महाराष्ट्र राज्य ) राजेंद्र गायकवाड ( सेवाभावी उद्योजक जांबे ,पिपरी चिंचवड ) संतोष महाराज काळे (सेवाभावी किर्तनकार ) ईशान संगमनेरकर ( ज्येष्ठ बोल्ड कवी मुंबई यांच्या उपस्थितीत कविचे सत्कार करण्यात आले तर पुरस्कार वितरण करण्यात आले कार्यक्रमांची सांगता पसायदान घेऊन करण्यात आली . या कार्यक्रमाचे आयोजन खूप सुंदर पद्धतीने करण्यात आले .
राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा व परिवर्तनवादी कवितांच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष ईशान संगमनेरकर (ज्येष्ठ बोल्ड कवी ) होते तर ज्यांच्या शुभहस्ते मनिषा फुले ( सहाय्यक आयुक्त समाजकल्याण इतर मागास महाराष्ट्र राज्य ) व राजेंद्र गायकवाड (प्रसिद्ध सेवाभावी उद्योजक तसेच पंढरीनाथ हजारे (अध्यक्ष , अंबिका ग्रुप ) तसेच या कार्यक्रमासाठी जिव्हाळ्याचे नाते असलेले अस्मिता सावंत (प्रशासन अधिकारी , पिंपरी चिंचवड सायन्स पार्क) व ॲड तुषार पाचपुते (युवा कायदेतज्ज्ञ ) उपस्थिती सत्कारमूर्ती चे सत्कार संपन्न झाले
राष्ट्रीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले . १) अर्चना राहुल जाधव ( कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल पुणे) 2) डॉ रोहिणी मदने ( अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर ) ३ ) श्रीमती सुषमा भिमराव काटे (उपशिक्षिका जि प . प्रा . बोटेवस्ती बार्शी ) यांना आर्दश पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यानंतर राष्ट्रीय कार्यक्षम उद्योजक पुरस्कार हा ॲड गणेश सांडभोर (युवा सेवाभावी उद्योजक , राजगुरुनगर ) २ ) रोहिदास शिंदे (ज्येष्ठ सेवाभावी उद्योजक पिंपरी चिंचवड ) ३) डॉ राहुल विलास कांबळे ( सेवाभावी उद्योजक नाशिक) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार हा शुभांगी अनिल शिंदे ( ज्येष्ठ कवयित्री व लेखिका , हडपसर ) २) सीमा गांधी (प्रसिद्ध कवयित्री , पिंपरी – चिंचवड ) यांना साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
निंबुत गावच्या आदर्श माता व वाचनप्रेमी आजी बबई बनसोडे यांना जीवनगौरव पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे . बबई बनसोडे आजी मोठया आनंदाने सांगतात की महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्याने मला शाळेची पायरी चढता आली आणि लिहिता वाचता यायला लागले त्या पुढे असे ही सांगतात की त्यांचे चुलते लक्ष्मण जगताप हे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होते त्यामुळे समाजातील मुलीने शिक्षण घेतले पाहिजे अशी त्यांची विचारधारा असल्याने त्यांनी बबईबाई यांच्या शाळेत दाखल केले , त्यावेळी संपूर्ण कांबळेश्वर भागात त्याकाळी शाळेमध्ये फक्त तीनच मुली होत्या . कांबळेश्वर मध्ये सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर जवळपास शाळा नसल्याने पुढील शिक्षण त्यांना घेता आले नाही आणि शिक्षण थांबले , शिक्षण थांबल्यामुळे लग्न झालं आणि वाचणं लेखन ही थांबले .
लग्नानंतर निंबूत येथे आल्यानंतर त्यांचे पती केरबा बनसोडे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याची तळमळ असल्याने त्यांच्या सर्व वेळ हा राजकारण व समाजकारणात जात असे , त्यामुळे घराकडे आणि कुटुंबाकडे व शेती कडे व्यवस्थित लक्ष देता येत नव्हते , तेव्हा शेती व कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आल्याने पुस्तकांची वाचनाची आवड मागे पडत गेली , आणि शेती कुटुंब मुला मुलीच्या शिक्षणाची या जबाबदार त्यांनी मोठ्या जिद्दीने पार पडला सुरुवातीच्या काळात त्यांना मोलमजुरीची कामे सुद्धा करावी लागली होती . निंबुत गावचे काकडे परिवाऱ व त्यांच्या मिळालेल्या पाठिंबामुळे केरबा बनसोडे यांना सोमेश्वर कारखान्याची संचालक पद मिळाले होते ,राजकीय सामाजिक वारसा असल्याकारणाने त्या काळी कोणतीही आरक्षण नसताना 1963 मध्ये देशातले पहिले सर्व महिला सदस्य असलेले निंबुत ग्रामपंचायतीच्या बबई बनसोडे या सदस्य झाल्या होत्या
बबईबाई यांच्या सध्याचे जीवन हे खूप आनंददायी आहे सकाळी सहाला उठून स्वतःचे स्वतः आवरायचे. आणि घरासमोरच्या झोपाळ्यात बसून दिवसभर वाचत बसायचे हा त्यांचा आता नित्यनियम झाला आहे. लहानपणी वाचनाची आवड होती, परंतु लग्नानंतर जबाबदाऱ्या पेलता पेलता आयुष्य सरून गेले. उतारवयात गेली आठ-दहा वर्ष त्या घरात येणारे वृत्तपत्र आवर्जून वाचत असत. आता गेल्या वर्षभरापासून पुस्तकांची गोडी लागली असल्याने त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज , आण्णाभाऊ साठे यांची वैचारिक जडण घडण होणारी पुस्तके त्यांनी आवडीने वाचून काढली ,तसेच त्यांनी अनिल अवचट शरद पवार , सुधाताई सपकाळ यांची ही पुस्तके वाचण्यात त्या मग्न असतात त्यांचे चिरंजीव निवृत्त मुख्याध्यापक भीमराव बनसोडे व प्रगतिशील शेतकरी राजकुमार बनसोडे यांना पुस्तके पुरविण्याचे काम लागले आहे. नातू देखील काकडे महाविद्यालयातून पुस्तके आणून देतो आणि बबईबाई त्यांचा फडशा पाडतात.तीन पिढ्या डोळ्यांसमोर एकत्र नांदत आहेत हे खरे सुख. तब्येतीची कुठलीच तक्रार नाही. चष्म्याशिवाय पेपर वाचायचे आता पुस्तके वाचण्यात त्या मग्न असतात.
आदर्श वाचनप्रेमी माता मा. श्रीमती बबई बनसोडे रहाणार
निंबुत, ता. बारामती. यांचे वय८४वर्षे असुन त्या चश्म्या विना पुस्तकं आणि वर्तमान पत्र आजहि वाचतात, यांच शिक्षण ७वी पर्यंत झाले आहे. यांचा सत्कार “काव्यमित्र संस्था” चिंचवड, पुणे यांनी रविवार दि.७/४/२०२४ रोजी केला.
मी ईशान संगमनेरकर आणि मा. मनिषाताई फुले (सहा. आयुक्त समाजकल्याण आणि मागासवर्गीय, महाराष्ट्र राज्य) यांना या आजींचा सत्कार करण्याचा मान मिळाला. मन भरुन आलं, आणि आमचा सत्कार झाल्यासारखं वाटल. आज मराठी वाचन संस्कृती वाढण्यासाठी या आजी “वाचन दूत” आहेत. मला अभिमान वाटला कि अशा व्यक्तिमत्त्वाचा सहवास आम्हाला मिळाला. धन्यवाद “काव्यमित्र संस्था” ईशान संगमनेरकर.



