chhattisgarh accident : छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस ५० फूट खोल खाणीत पडली, १५ ठार १६ जखमी

0
27
chhattisgarh accident : छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस ५० फूट खोल खाणीत पडली, १५ ठार १६ जखमी


chhattisgarh Durg district accident : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्री कर्मचाऱ्यांनी भरलेली बस सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. त्यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कुम्हारी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. प्राथमिक उपचारानंतर जखमींना रायपूर एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी जखमींवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.



Source link