Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशBurning Train | मध्य प्रदेशात 'बर्निंग ट्रेन'चा थरार; मालगाडीच्या इंजिनाला आग लागल्याने...

Burning Train | मध्य प्रदेशात ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; मालगाडीच्या इंजिनाला आग लागल्याने लोको पायलटने ‘असा’ वाचवला जीव | Navarashtra (नवराष्ट्र)

Burning Train | मध्य प्रदेशात ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; मालगाडीच्या इंजिनाला आग लागल्याने लोको पायलटने ‘असा’ वाचवला जीव | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

सागर जिल्ह्यातील बिना येथे कोळसा भरलेल्या मालगाडीच्या इंजिनला अचानक आग लागली. काही वेळातच आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरू लागले. विशेष म्हणजे आग लागताच लोको पायलट ट्रेनमधून खाली उतरल्याने त्याचा जीव वाचला.

बिना : सागर जिल्ह्यातील बिना येथे कोळसा भरलेल्या मालगाडीच्या इंजिनला अचानक आग लागली. काही वेळातच आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरू लागले. विशेष म्हणजे आग लागताच लोको पायलट ट्रेनमधून खाली उतरल्याने त्याचा जीव वाचला. बीना-कोटा रेल्वे मार्गावरील सेमरखेडी स्थानकाजवळ ही घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी-कर्मचारी, पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. बीना रिफायनरीसह बीना पालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. सुमारे 35-40 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आल्याचे बीना तहसीलदार सुनील शर्मा यांनी सांगितले. इंजिन पूर्णपणे जळून खाक झाल्याने आग किती तीव्र होती, याचा अंदाज येतो. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments