
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खडसे साहेब भाजपात जात आहेत, या चर्चेची मला माहिती नाही. खडसे साहेबांची तब्येत बरी नाही, माझे रोहिणी ताईंशी सकाळी बोलणं झाले आहे. हॉस्पिटल आणि स्ट्रेसमुळे खडसेंची तब्येत ठीक नाही, त्यांच्या बोलण्यावरून तसं काही वाटलं नाही,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.





