Thursday, August 27, 2026
Homeब्लॉगसम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून  महाड इंदापूर जवळच्या कुडा लेणीवर एक दिवसीय अभ्यास...

सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून  महाड इंदापूर जवळच्या कुडा लेणीवर एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला होता,

Proud feeling movement to stand beside priyanka !

…. तर झालं असं सम्यक सांस्कृतिक संघाने आयोजित केलेल्या कुडा लेणी अभ्यास दौऱ्यावर २९ मार्च २०२४ रोजी प्रियंका उपस्थित होती, या आधीच्या म्हणजे मुंबई अंधेरीमधील कोंडीविटे लेणीवर ती येणार होती पण आपल्या कार्यात व्यस्त असल्याने ती येऊ शकली नाही पण कुडा लेणी अभ्यास दौरा जाहीर झाला आणि पहिले नाव तीने नोंदवले तशी ती हजर ही झाली , काहीच न बोलता लेणी समजून घेत होती पण आपल्या कार्याच्या “उंचीतून” भल्याभल्यांची बोलती बंद करणारी प्रियंका अभ्यास दौऱ्यावर फक्त ऐकत होती तिच्या विषयी थोडक्यात सिध्दार्थने सांगीतले होते पण सखोल अशी माहीती नव्हती पण तिच्या विषयी जेव्हा सर्च केले तेव्हा लक्षात आले की प्रियांकाला तब्बल ३०+ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तर आंतराष्ट्रीय ६ पुरस्कार मिळाले आहेत ज्यात Nelson Mondale पुरस्काराचा समावेश होतो.

भारतीय समाजात सेक्स आणि मासिक पाळी यावर सहजासहजी बोललेले जात नाही टाळले जाते नेमकी त्याच विषयावर भारतभर आणि जगभर प्रियंका प्रबोधन करत आली आहे तिचे लेक्चर आयोजित केले जात आहेत व तिच्या Helping Hands Welfare Society च्या माध्यमातून प्रियांकाने आतापर्यंत तब्बल दहा लाख Sanitary Pads चे वाटप केले आहे याच कार्याची दखल घेऊन वरील पुरस्कार तिला आतापर्यंत मिळाले आहेत.

प्रियांका तुझे कार्य असेच वृद्धिंगत होत राहो हीच मंगल कामना…नमो बुद्धाय जय भीम !

सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून २९ मार्च २०२४ रोजी महाड इंदापूर जवळच्या कुडा लेणीवर एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला गेला होता, या अभ्यास दौऱ्यावर समाजातील मित्र अभिनेते Vaibhav Pandurang Satpute सर आवर्जून उपस्थित होते, व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून ते कुडा लेणी अभ्यास दौऱ्याला उपस्थित राहीले होते खरंतर ते या आधीच्या मुंबईतील अंधेरीमधील कोंडिविटे लेणी अभ्यास दौऱ्यावर येणार होते व पण वेळे अभावी शक्य झाले नाही मात्र या वेळेस वेळात वेळ काढून अभ्यास दौऱ्यात समाविष्ट झाले होते.
आपल्या समाजातील नाट्य सिनेसृष्टीतील अभिनेते कलाकार आपली ओळख लपवून “कांबळे चे कांबळी” करून धडपड करतांना दिसतात तिथे वैभव सर मात्र या गोष्टींना छेद देतांना मला दिसून आले, “सातपुते” हे आडनाव तसे कळून ही येत नसतांना त्यांनी मात्र आपली ओळख कधी लपवली नाही हे विशेष, उल्लेखनीय बाब ही आहे की कोणताही बडेजाव नाही की “विशेष” आहे असला कोणत्याच प्रकारचा अविर्भाव त्यांनी आणला नाही, अभ्यासू जिज्ञासू चिकित्सक या दृष्टीकोनातून सर्व प्रवासात आणि लेणीवर ते मला दिसून आले simple living and high thinking या युक्ति प्रमाणे त्यांची छबी, अभ्यास दौऱ्यावर असतांना ते सर्वसाधारण सदस्यांच्या प्रमाणे लेणी समजून घेत होते काही प्रश्न प्रवासात आणि नंतर देखील त्यांनी विचारले यातून त्यांची आपल्या वारसा स्थळासंदर्भात असलेली तळमळ दिसून आली, वेळ मिळाल्यास ते आपल्याला सम्यक सांस्कृतिक संघाने आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यातून पुन्हा दिसून येतील.

सातपुते सरांचा त्यांचा अभिनय क्षेत्रातील आलेख असाच दिवसागणिक वृद्धिंगत होत राहो अशी मंगल कामना करतो….नमो बुद्धाय जय भीम ! 🙏🏻

सूरज रतन जगताप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments