Thursday, August 27, 2026
Homeब्लॉगप्रियदर्शी सम्राट अशोक" आणि त्यांचे इतर देशांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध…!

प्रियदर्शी सम्राट अशोक” आणि त्यांचे इतर देशांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध…!

प्रियदर्शी सम्राट अशोक” आणि त्यांचे इतर देशांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध…!

चक्रवर्ती सम्राट अशोक हे किती दूरदृष्टीचे होते हे आपल्या त्यांनी तयार करून घेतलेल्या शिलालेख वरून दिसुन येते, त्यांनी आपले शिलालेख इतर कोणताही माध्यम न वापरता दगड हे माध्यम वापरुन चिरकाल टिकेल असं माध्यम निवडून ते लेख कोरून घेतले.

सम्राट अशोक आपल्या प्रजेच्या हितासाठी नेहेमी तत्पर असतं, त्यांचे त्यांच्या प्रजेशी व इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध होते असे “शहाबाजगडीच्या” त्यांच्या शिलालेखातून स्पष्ट होते.

राज्य अभिषेकच्या आठव्या वर्षी हा शिलालेख कोरण्यात आला होता.

शिलालेखातील महत्त्वपूर्ण गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जे देश होते ज्यांचे सम्राटांचे मैत्रीपूर्ण संबंध त्यांची नावे आजच्या पेक्षा त्यावेळी म्हणजे सम्राट अशोक यांच्या काळात वेगळी होती, ती पुढील प्रमाणे असे आहेत.

१) अंतीयोक हा “सिरिया” देशाचा राजा होता.

२) तुरमय हा “इजिप्तचा” राजा “टॉलोमी फिलाडेल्फस” हा होता. (राज्य काल ख्रि. पू. २८५ ते २४७ हा होता)

३) किनि किंवा अन्तिकिनी हा “मॅसिडोनियाचा” राजा होता (राज्य काल ख्रि पू २७८ ते २३९)

४) आंटिगोनस (“गोनाटस” या नावाचे अपभ्रंश) मक म्हणजे “सायरीनचा” राजा होता. (टॉलेमी फिलाडेल्फसचा सावत्र भाऊ) राज्य काल ख्रि पू ३०० ते २५०

५) अलेक्झांडर हा “कॉरिंथ” येथील राजा होता (राज्य काल ख्रि पू २५२ ते २४४ )

६) “ताम्रपर्णी” म्हणजे आजचा “श्रीलंका”, होय सम्राट अशोक यांच्या काळात “श्रीलंकेला” “ताम्रपर्णी” असेच नाव होते. “ताम्रपर्णीचे” पुढे “सिंहलदीप” झाले व नंतर “श्रीलंका” म्हणूनच ओळखू लागले. आजही श्रीलंकेतील भाषा जी बोलली जाते तीचे नाव

“सिंहलीच” आहे .

अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला सम्राट अशोक यांच्या बाबतीत समजण्यास मदत मिळते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments