Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशआजोबांनी 1994 ला खरेदी केले SBI चे शेअर्स, 30 वर्षानंतर नातवाचं नशिब...

आजोबांनी 1994 ला खरेदी केले SBI चे शेअर्स, 30 वर्षानंतर नातवाचं नशिब फळफळलं, आत्ताची किंमत पाहून डोळे गरगरतील

[ad_1]

SBI shares holding equity : नव्या उच्चांकानंतर आज मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स जवळपास 150 अंकांनी घसरल्याचं दिसून आलं. शेअर बाजारातील गुंतवणूक किती परतावा देते याची कल्पना अनेकांना आली असावी. मात्र, एखादा शेअर तुमच्याकडे जर 30 वर्षापासून असेल तर तुम्ही किती मालामाल व्हाल, याचा अंदाज तुम्हालाही येणार नाही. अशीच काहीशी घटना चंदीगडमधील एका डॉक्टरसोबत घडली आहे. डॉ.तन्मय मोतीवाला (Dr. Tanmay Motiwala) जे व्यवसायाने डॉक्टर आणि बालरोगतज्ञ आहेत, त्यांनी आजोबांनी 30 वर्षांपूर्वी एक असा निर्णय घेतला. ज्यामुळे आता नातू तन्मय यांना मोठा फायदा झाला आहे. आजोबांनी 500 रुपयांचे एसबीआयचे शेअर्स (SBI shares price) खरेदी केले होते, ती गुंतवणूक आता 750 पटीने वाढली आहे. 

नेमकं काय झालं?

झालं असं की, जेव्हा डॉ. तन्मय मोतीवाला हे आपल्या कुटुंबाच्या संपत्तीचं गणित जुळवत होते. तेव्हा कागदपत्रांमधून क्रमवारी लावत असताना त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरचे सर्टिफिकेट मिळाले. सर्टिफिकेट पाहून त्यांना काही समजलं नाही. त्यानंतर निरखून पाहिल्यावर हे शेअर्सचं सर्टिफिकेट असल्याचं त्यांना समजलं. डॉ. तन्मय यांच्या आजोबांनी 30 वर्षांपूर्वी 500 रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. त्यानंतर आता याच शेअर्चची किंमत तब्बल 750 पटीने वाढली आहे. 

काय म्हणाले डॉक्टर तन्मय?

माझ्या आजोबांनी 1994 मध्ये 500 रुपये किमतीचे एसबीआयचे शेअर्स खरेदी केले होते, जे आजोबांनी कधीही विकले नाहीत आणि कदाचित ते त्याबद्दल विसरले असतील. 1994 ला खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत सध्याच्या घडीला 750 पटीने वाढली असून याची किंमत आता 3.75 लाख झाली आहे, असं तन्मय यांनी सांगितलंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर करत त्यांनी ही माहिती शेअर केली. मी बऱ्याच लोकांनी विचारलं की, याचं सध्याचं मूल्यांकन काय आहे? तर याची साधारण किंमत 3.75 लाख असल्याचं मला सल्लागारांनी सांगितलंय. ही खूप मोठी रक्कम नाही, पण 30 वर्षात मिळालेला 750 पट नफा खऱ्या अर्थाने मोठी गोष्ट आहे, असं तन्मय सांगतात. 

दरम्यान,प्र माणपत्रावरील नाव, पत्ता, स्वाक्षरी जुळत नसणं इत्यादींमध्ये शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात. मात्र, सल्लागारांची मदत घेऊन ही रक्कम आम्ही डीमॅट अकाऊंटमध्ये वळवू, असंही डॉ तन्मय यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments