Saturday, October 10, 2026
Homeमनोरंजन‘रोशन भाभी’ केस जिंकली; लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या...

‘रोशन भाभी’ केस जिंकली; लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांना लाखोंचा दंड!

[ad_1]

या प्रकरणातील निर्णय जेनिफरच्या बाजूने लागला आहे. जेनिफरने असित मोदीवर जे काही आरोप केले आहेत, त्यावर न्यायालयाने तिचे समर्थन केले आहे. यासोबतच न्यायालयाने असित मोदीला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. वृत्तानुसार, असितने जेनिफरला १०% व्याजासह संपूर्ण पैसे द्यावे लागतील, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या रकमेव्यतिरिक्त असित कुमार मोदी, जेनिफरला आणखी ५ लाख रुपये दंड म्हणून देणार आहे. मात्र, कोर्टाच्या निर्णयावर अभिनेत्री खूश नाही. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान जेनिफरने केस जिंकल्याबद्दल सांगितले होते. यावेळी ती म्हणाली की, ‘होय, मी केस जिंकली आहे. या खटल्याचा निर्णय होऊन ४० दिवस उलटले आहेत. पण आत्तापर्यंत प्रॉडक्शन हाऊसने मला पैसे दिलेले नाहीत. हा माझ्या कष्टाने कमावलेला पैसा आहे. न्यायासाठी मी न्यायालयात धाव घेतली, पण वर्ष उलटूनही मला माझे पैसे मिळालेले नाहीत. आजपर्यंत न्याय मिळालेला नाही.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments