Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशSwami Smaranananda Maharaj | स्वामी स्मरणानंद महाराज यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी...

Swami Smaranananda Maharaj | स्वामी स्मरणानंद महाराज यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन, ममता बॅनर्जींसह पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक! | Navarashtra (नवराष्ट्र)

Swami Smaranananda Maharaj | स्वामी स्मरणानंद महाराज यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन, ममता बॅनर्जींसह पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

स्वामी स्मरणानंद महाराज यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन, ममता बॅनर्जींसह पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक!

रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचे मंगळवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते.

रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज (ramakrishna missionchief swami smaranananda maharaj) यांचे मंगळवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. 29 जानेवारीपासून त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरूहोते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांना सेप्टिसीमिया झाला आणि ३ मार्च रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तसेच त्यांना किडनीचाही त्रास असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे पूज्य अध्यक्ष स्वामी स्मरणानंद जी महाराज यांनी आपले जीवन अध्यात्म आणि सेवेसाठी समर्पित केले. असंख्य हृदयांवर आणि मनावर त्यांनी अमिट छाप सोडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझे त्याच्याशी खूप घट्ट नाते आहे. मला 2020 मध्ये माझी बेलूर मठाची भेट आठवते, जेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधला होता. काही आठवड्यांपूर्वी मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कोलकाता येथील रुग्णालयातही गेलो होतो. बेलूर मठातील असंख्य भक्तांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments