Mumbai News: मुंबईत धुलिवंदनाच्या आनंदाला गालबोट, माहीमच्या समुद्रात ५ तरुण बुडाले

0
19
Mumbai News: मुंबईत धुलिवंदनाच्या आनंदाला गालबोट, माहीमच्या समुद्रात ५ तरुण बुडाले


पाच तरुण बुडाल्याचे किनाऱ्यावरील लोकांनी पाहिले. त्यांनी यातील ४ जणांना वाचवले. यातील २ तरुण सुखरुप असून दोघांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक तरुण अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. यश कागडा असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तर हर्ष किंजले असे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी माहीम पोलीस, अग्निशामक दलाचे पथक, सागरी पोलीस आणि स्वयंसेवक उपस्थित असून बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात आहे.



Source link