Wednesday, September 30, 2026
Homeसातारापुढील काळात चेतन शिंदे व संपूर्ण कुटुंबियांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणार; शरद...

पुढील काळात चेतन शिंदे व संपूर्ण कुटुंबियांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणार; शरद पवार

फलटण : माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी फलटण येथील ज्येष्ठ नेते स्व . सुभाष शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले असल्याने ,शिंदे कुटुंबियांच्या सांत्वन पर भेटीसाठी स्व सुभाष शिंदे यांच्या ” जिद्द ” या निवासस्थानी आले होते . यावेळी पुढील काळात चेतन शिंदे व संपूर्ण कुटुंबियांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणार असल्याचे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले

यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल देशमुख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना पवार म्हणाले की; सुभाष शिंदे यांचे व माझ्या संपूर्ण कुटुंबियांचे अतिशय निकटचे संबंध होते. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी मी आलो असताना सुभाष शिंदे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागतासाठी येत असत. त्यावेळी त्यांचा हार सुद्धा ठरलेला होता. सुभाष शिंदे यांची पोकळी भरून काढणे शक्य नाही. आगामी काळामध्ये माझ्यास फलटण तालुक्यातील सर्व जनतेने चेतन व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे

सुभाष शिंदे व त्यांचे सहकारी गत ३५ वर्षे हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुस्तकाचे प्रकाशन करीत असत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे पुस्तक व प्रकाशन सोहळा हा अतिशय दिमाखात होत असे; असे मत व्यक्त करीत सुभाष शिंदे यांच्या जुन्या आठवणीना शरद पवार यांनी उजाळा दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments