उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी (RTO ) जागा लपलब्ध : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

0
18
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी (RTO ) जागा लपलब्ध : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण – माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील जनतेला वाहन पासिंगसाठी व आरटीओ कार्यालयाच्या कामानिमित्त सातारा येथे जावे लागत होते. त्यामुळे खर्च व त्रास फलटण तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात होत होता.

याची दखल घेऊन खासदार साहेबांनी फलटण तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी नवीन आरटीओ कार्यालय नुकतेच मंजूर करून आणले.

आज माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) साठी जागा उपलब्ध करून सातारा आरटीओ कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संदीप म्हेत्रे साहेब, मोटार वाहन निरीक्षक योगेश ओतारी, सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल थोरात या अधिकाऱ्यांसमवेत जागेची पाहणी केली व लवकरच नवीन कार्यालय बांधण्यासाठी साधारण तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल व आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असेही खासदार साहेबांनी बोलताना अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.