Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रमहादेव जानकर यांना विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वाद मिळाला आहे का? असे...

महादेव जानकर यांना विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वाद मिळाला आहे का? असे प्रश्न सद्या माढा लोकसभा मतदारसंघात उपस्थित झाला आहे ?

फलटणःमहाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष , माजी मंत्री विद्यमान आमदार महादेव जानकर हे काही दिवसांपासून यांच्या समवेत कायमच असल्याचे दिसत आहे महादेव जानकर यांना विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वाद मिळाला आहे का .? असे प्रश्न सद्या माढा लोकसभा मतदारसंघात उपस्थित झाला आहे . कारण माढा लोकसभा मतदार संघातून महादेव जानकर हे निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे .

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे . माढा लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते -पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते – पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे . त्यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी सुद्धा केली आहे

सन 2019 आली माढा लोकसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचा गट हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम करत होता. परंतु त्यानंतर पुलाखालुन बरेच पाणी गेले आहे. त्यामुळे सन 2019 साली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यामधून तब्बल एक लाखांचे लीड मिळाले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये जर महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी असेल तर मोहिते पाटील गट महायुतीच्या विरोधात काम करेल; असे मत अनेक जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांनी महादेव जानकर यांना आशीर्वाद दिला आहे का? भारतीय जनता पार्टीने जर उमेदवारी देताना विचार केला नाही तर नक्कीच मोहिते पाटील गट आहे महादेव जानकर यांना मदत करेल असे मत व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments