Tuesday, October 6, 2026
Homeक्रीडाIND vs ENG 5th Test : धर्मशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा...

IND vs ENG 5th Test : धर्मशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा दबदबा | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धर्मशाला येथे सुरू आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 218 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने आक्रमक खेळी केली. भारताचे सलामीवीर रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागिदारी केली. इंग्लंडचा गोलंदाज बशिरने विकेटकीपर फोक्सकरवी जैस्वालला बाद करत ही भागिदारी तोडली. जैस्वालने 57 धावांची खेळी केली. सध्या रोहित नाबाद 50 तर शुभमन नाबाद 26 धावांवर खेळत आहे. सामन्यात भारत अजून 83 धावांनी मागे आहे. (IND vs ENG 5th Test)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी फोडली. त्याने डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेटने आपल्या खेळीत 27 धावा केल्या. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोप 11 धावा करू शकला. (IND vs ENG 5th Test)

पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी 25.3 षटके टाकली. यामध्ये इंग्लंडने 2 विकेट गमावून 100 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 29.3 षटकात 6 गडी गमावून 94 धावा केल्या. एके काळी इंग्लंडची धावसंख्या ३८व्या षटकात दोन गडी बाद १३७ धावा अशी होती. क्रॉलीची विकेट पडल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. 137 धावांवर दोन बाद अशी धावसंख्या असलेला संघ 58 व्या षटकात 218 धावांवर गारद झाला.

क्रॉलीने 108 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 79 धावा केल्या. जो रूट 26 धावा करून बाद झाला, तर 100वी कसोटी खेळणारा जॉनी बेअरस्टो 29 धावा करून बाद झाला. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही. इंग्लंडची धावसंख्या 175 धावांवर असताना संघाने बेअरस्टो, रूट आणि स्टोक्सच्या विकेट्स गमावल्या. अश्विनने डावाच्या 50 व्या षटकात हार्टली (6) आणि वूड (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अँडरसनला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा डाव 218 धावांवर आटोपला. बशीर 11 धावा करून नाबाद राहिला. गोलंदाजीमध्ये भारताकडून कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी सामन्यात चार विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट  फिरकीपटूंनी घेतल्या.

हेही वाचा :











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments