Monday, August 31, 2026
Homeसाताराआम्ही सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला आहे; त्या निर्णयासोबतच आम्ही पुढे जाणार...

आम्ही सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला आहे; त्या निर्णयासोबतच आम्ही पुढे जाणार आहोत; संजीवराजे

फलटण : “लक्ष्मी – विलास पॅलेस” या विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे बोलत होते . यावेळी फलटण तालुक्याचे  आमदार दिपक चव्हाण , फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग गुंजवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते .

आगामी काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक आलेली आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन आमदार असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटला पाहिजे अशी आम्ही आग्रही मागणी केली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय घडामोडी घडणार आहेत. याकडे सर्वांचेच लक्ष आहे. परंतु आम्ही सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला आहे; त्या निर्णयासोबतच आम्ही पुढे जाणार आहोत; असे मत सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाही निंबाळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी फलटण शहरासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या निधींची व योजनांची माहिती यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments