Spanish woman Assault Case | अत्याचाराच्या घटनेनंतरही स्पॅनिश महिलेनं घेतली भारताची बाजू; टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
24
Spanish woman Assault Case | अत्याचाराच्या घटनेनंतरही स्पॅनिश महिलेनं घेतली भारताची बाजू; टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर | Navarashtra (नवराष्ट्र)


अत्याचाराच्या घटनेनंतरही स्पॅनिश महिलेनं घेतली भारताची बाजू; टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर

मागील काही दिवसांपासून झारखंड येथे स्पॅनिश येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराची चर्चा सर्व स्तरावर सुरु आहे. या ब्लॉगर महिलेने एवढ्या मोठ्या घटनेनंतर देखील भारताची बाजू घेतली आहे.

झारखंड : मागील काही दिवसांपासून झारखंड येथे स्पॅनिश येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराची चर्चा सर्व स्तरावर सुरु आहे. भारतामध्ये या महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्यामुळे सर्व जण रोष व्यक्त करत आहेत. हे प्रकरण जागतिक स्तरावर चर्चिले जाऊ लागल्यानंतर संबंधित स्पॅनिश पर्यटकाची भूमिका समोर आली आहे. या ब्लॉगर महिलेने एवढ्या मोठ्या घटनेनंतर देखील भारताची बाजू घेतली आहे. त्याचबरोबर टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

या स्पॅनिश महिलेने सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘स्पेन असो, ब्राझील, अमेरिका किंवा इतर कोणताही देश, जगातील प्रत्येक देशात अशा घटना घडतात. आम्ही भारतात होतो म्हणून असं झालं म्हणणं बंद करा. सोमवारी मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी पीडितेची भेट घेऊन तिचा जबाब नोंदवला. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरितांच्या शोध सुरू आहे.  मुद्दा असा आहे की बलात्कार किंवा दरोडा. तुमच्यावर, तुमच्या भावावर, तुमच्या आईवर, तुमच्या मुलीवर किंवा कोणावरही होऊ शकतो,” असे मत त्या महिलेने मांडले आहे. तसेच या स्पॅनिश जोडप्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. जगातील कोणताही देशात अशा घटना घडत नाहीत असे नाही. स्पेनमध्येही असे अनेकदा घडले आहे. हे जगभर घडले आहे…स्पेन,ब्राझील,अमेरिका,सर्व देशांमध्ये घडले आहे…म्हणून आपण भारतात आहोत म्हणून हे घडले असे बोलू नका. अशा शब्दांत या जोडप्याने भारताची बाजू सावरली आहे.






Source link