
फलटणः फलटण येथील मनोहर भिडे यांच्या सभेची परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी दलित पँथर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे . यावेळी जाती जातीत तेड निर्माण करून महापुरुषांबाबत सातत्याने चुकीचे विधान करणारे मनोहर भिडे यांची सभा उधळून लावण्यात येईल असे निवेदन दलित पँथर संघटनेच्या वतीने देण्यात आल्याची माहिती राज्यसचिव रोहित अहिवळे यांनी दिली . मनोहर भिडे यांच्या फलटण येथील सभेच्या निमित्ताने दलित संघटना आक्रमक झाल्याचे यावेळी सांगण्यात आले . या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की , नेहमीच महापुरुषांबाबत वादग्रस्त गरळ ओकणारा व महिल्याबद्दल अपशब्द मनोहर भिडे यांच्या वादग्रस्त विधानाने आत्ता पर्यंत दंगली घडलेल्या आहेत
फलटण .शहराची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने फलटण मध्ये मनोहर भिडे येणार असल्याचे आम्हाला संशय होत आहे. त्यामुळे फलटण शहराची शांतता व जातीय सलोखा अबाधीत राहावी यासाठी फलटण शहर व ग्रामीण पोलीसांनी याची नोंद घ्यावी व फलटण शहराबरोबरच तालुक्यात मनोहर भिडेची सभेस मान्यता देऊ नये अन्यथा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सभा उधळुन लावतील याची गांभिर्याने नोंद घ्यावी असे शेवटी निवेदनात म्हटले आहे. यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी राजकीय मान्यवर उपस्थित होते.








