Sunday, August 23, 2026
Homeसातारासार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात फलटण शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली :

सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात फलटण शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली :

दि २९ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री शहरात विविध ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी शांततेच्या भंग करणाऱ्या चौघांच्या विरोधात फलटण शहर पोलिसांनी स्टेशनला वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत

दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात फलटण शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२९/०२/२०२४ रोजी पोलीस गस्त घालत असताना, फलटण शहर पोलीस ठाणेच्या हद्दीत खालील नमुद इसम दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने, त्यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाणे येथे कलम ८५(१) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

खालील व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १) गु.नों.क्र. ११६/२०२४ – राहुल भगवान पवार, रा. हरिबुवा मंदिर शेजारी, मलठण, फलटण. २) गु.नों.क्र.११७/२०२४ – श्रीराज जितेंद्र डोईफोडे रा. – रविवार पेठ. फलटण. ३) गु.नों.क्र.११८/२०२४ – नितीन बाळू साळुख, वर ३८ वर्षे, रा. गडसोली मैदान, फलटण. ४) गु.नों.क्र.११९/२०२४- मयुर जयवंत कुंभार, वय ३२ वर्षे, रा. कुंभार गल्ली, रविवार पेठ, फलटण.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments