Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रPune Gangadham fire: कोंढव्यात गंगाधाम फेज दोनच्या सोसायटीच्या सदनिकेत अग्नितांडव; अग्निशामक दलाने...

Pune Gangadham fire: कोंढव्यात गंगाधाम फेज दोनच्या सोसायटीच्या सदनिकेत अग्नितांडव; अग्निशामक दलाने केली ५ जणांची सुटका

Pune Gangadham fire: कोंढव्यात गंगाधाम फेज दोनच्या सोसायटीच्या सदनिकेत अग्नितांडव; अग्निशामक दलाने केली ५ जणांची सुटका

[ad_1]

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सात मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर चार खोल्या असलेल्या एका सदनिकेत आग लागली असून मोठ्या प्रमाणात धुर निघत होता. जवानांनी तातडीने बचाव मोहीम हाती घेत होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा सुरु केला. दरम्यान, आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला असता जवानांनी आतमध्ये कोणी आहे का याची खात्री करत असतांना बाल्कनीमध्ये कुटूंबातील एकुण पाच जण अडकल्याचे दिसले. यात एक जेष्ठ महिला, एक दांपत्य व त्यांची दोन लहान मुले होती. जवानांनी या सर्वांना सुखरुप बाहेर घेत त्यांची सुटका केली. सुमारे तीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सदनिकेत पुढील खोलीमध्ये असणारया पेटत्या दिव्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आल आहे. सदनिकेतील सर्व गृहपयोगी साहित्य जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाची मदत वेळेवर पोहोचल्याने जवानांनी आग इतरञ पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे. या इमारतीत असलेली स्थायी अग्निशमन यंञणा या घटनेवेळी कार्यान्वित नसल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments