Saturday, August 15, 2026
Homeसातारा30 मराठा आंदोलकांवर रास्तारोको प्रकरणी गुन्हे दाखल : फलटण

30 मराठा आंदोलकांवर रास्तारोको प्रकरणी गुन्हे दाखल : फलटण

फलटण :- मराठा आरक्षण मागणी करिता मराठा समाजाचे वतीने बेकायदेशीर जमाव जमवुन बेकायदेशीर रस्ता आडवुन फलटण ते दहिवडी रस्ता दुहेरी वाहतुकीस बेकायदेशीर अटकाव केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी ३० जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार मिळालेली महिती अशी आहे की, दिनांक २४ रोजी मराठा आरक्षण मागणी करिता मराठा समाजाचे वतीने फलटण तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिसांना मिळाली असता सकाळी ९ वाजल्या पासुन पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.दरम्यान मौजे झिरपवाडी गावचे हद्दीत हॉटेल वर्षा समोरील डांबरी रोडवर प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पो. कॉ मुकेश बाबाराव घोरपडे, पोउनि शिंदे, सफौ कदम, पोहवा होले,पोहवा जगताप, मपोहवा फाळके, पोहवा वाडकर,होमगार्ड कळसाईत होमगार्ड सुळ हे हॉटेल वर्षा ढाब्यासमोर डांबरी रोडवर बंदोबस्त करीत असताना.सकाळी ११:२० वाजण्याच्या सुमारास मौजे झिरपवाडी परिसरात सुमारे २० ते ३० लोक बेकायदेशीर जमाव जमवुन डांबरी रोडवर आले त्यांनी फलटण-दहिवडी रोड आडवला व रोडवर येणारी जाणारी वाहने डांबरी रस्ता बंद केला.त्यामुळे या ठिकाणावरील दोन्ही बाजुची वाहतुक थांबवुन वाहनाच्या रांगा दोन्ही बाजुस थांबुन राहिल्या त्यानंतर ११:४५ वाजेपर्यत वाहतुक खोळंबून राहिल्याने आंदोलनकर्ते यांना शहर पोलिसांनी विनंती केली परंत ते त्यांचे निर्णयाशी ठाम असलेने त्यांना पोलिसांनी रास्ता रोको करु नका असे समजावुन सांगुन रस्त्यावरुन बाजुला घेतले व रस्ता वाहतुकीस खुला केला.

या प्रकरणी तानाजी दिगंबर कदम (रा. भडकमकर नगर फलटण) सचिन तात्याबा गुंजवटे (रा. झिरपवाडी), रविंद्र ढेंबरे (रा. झिरपवाडी) (पुर्ण नाव माहित नाही), युवराज सस्ते (रा निरगुडी) (पूर्ण नाव माहित नाही), शिवदास गुंजवटे (रा झिरपवाडी) (पुर्ण नाव माहित नाही), आनंदा चव्हाण (रा झिरपवाडी) (पुर्ण नाव माहित नाही), गौरव तोडकर (रा झिरपवाडी) (पुर्ण नाव माहित नाही), ज्ञानेश्वर ढेंबरे (रा झिरपवाडी) (पुर्ण नाव माहित नाही), निलेश ढेंबरे (रा झिरपवाडी) (पुर्ण नाव माहित नाही), शंभुराज चव्हाण (रा झिरपवाडी) (पुर्ण नाव माहित नाही) व इतर १५ ते २० लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवुन बेकायदेशीर रस्ता आडवुन फलटण ते दहिवडी रस्ता दुहेरी वाहतुकीस बेकायदेशीर अटकाव केल्या प्रकरणी फिर्यादी पो. कॉ मुकेश बाबाराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार शहर पोलिस ठाण्यात ३० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments