Saturday, October 3, 2026
Homeसाताराफलटण तालूक्यातील दोन जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार

फलटण तालूक्यातील दोन जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार

फलटण : फलटण तालुक्यात जबरी चोरी करणे, दरोड्याची तयारी करणे, दुखापतकरून शिविगाळ दमदाटी करून विनयभंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या दोन जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.

फलटण तालुक्यातील फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतत गुन्हे करणाऱ्या टोळी प्रमुख १) किरण रमेश आवारे (वय २० वर्ष, रा. बिबी, ता. फलटण, जि. सातारा.) २) कुमार लालासो काकडे (वय २१ वर्ष, रा. बिबी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्यावर जबरी चोरी करणे, दरोड्याची तयारी करणे, दुखापतकरून शिविगाळ दमदाटी करून विनयभंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामिण पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण

तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता.प्रस्तावाची चौकशी फलटण विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आर. धस यांनी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख हद्दपार प्राधिकरण तथा यांचे समोर सुनावणी झाली असता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षांकरीता हद्दपारीचा आदेश मंजूर केला. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने,पो.हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण ग्रामिण पोलीस ठाणेचे पो. हवा. वैभव सूर्यवंशी, पो.ना. श्रीनाथ कदम यांनी योग्य पुरावा सादर केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments