भारतातील सर्वात मोठा_चैत्यगृह !

0
1
भारतातील सर्वात मोठा_चैत्यगृह !

This Chaitya is, without exception, the largest and finest, as well as the best preserved, of it’s class” : Mr Fergusson
(The Cave Temples of India , page 232 )

कार्ला लेणीतील चैत्यगृह हा त्याच्या काळातील मोठा आणि उत्कृष्ट असा चैत्यगृह आहे.

भारतात विखुरलेल्या अनेक लेणींच्या पैकी एक लेणी म्हणजे “कार्ला लेणी” मावळ तालुक्यातील लोणावळा जवळील ही लेणी तिच्या काळातील “शिल्पकलेतील” अती उच्च शिखर गाठलेली लेणी समूह समजली जाते , सर्व लेणींच्या चैत्यगृहांच्या पैकी कार्ला लेणीतील चैत्यगृह हा सर्वात मोठा लांबी रुंदीचा चैत्यगृह आहे.

जेम्स बर्जेस यांच्या पुस्तकातील नोंदी प्रमाणे सांगायचे झाले तर “The general dimensions of the interior are 124 feet 3 inches from the entrance to the back wall, by 45 feet 6 inches in wide.”
“In height, however, Karle is very inferior, being only 46 feet from the floor to the apex.”

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे अनुकूल परिस्थिती नसताना देखील इंग्रज व्यापारी आणि अधिकारी यांनी सर्वस्व पणाला लावून हा सांस्कृतिक अमुल्य ठेवा जोपासण्याचा प्रयत्न केला , वरील नोंदी पाहिल्या तर त्यांनी किती तपशीलवार माहिती गोळा केली इंच आणि इंच माहिती गोळा केली आहे, James Ferguson ( Scottish architect ) तर भारतात व्यापाऱ्याच्या निमित्ताने आले होते निळीच्या व्यापारात त्यांनी अमाप यश प्राप्त केले होते पण हा सांस्कृतिक वारसा त्यांना खुणावत होता आणि त्यातून त्यांच्या हातुन पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असा ग्रंथ प्रसिद्ध झाला ….!

The_Cave_Temples_of_India : Jame’s Burgess and James Ferguson.

सूरज रतन जगताप