Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशRahul Gandhi | राहुल गांधींचे श्रीकृष्णाच्या रुपातील पोस्टर व्हायरल; उत्तर प्रदेशातील बॅनरमुळे...

Rahul Gandhi | राहुल गांधींचे श्रीकृष्णाच्या रुपातील पोस्टर व्हायरल; उत्तर प्रदेशातील बॅनरमुळे राजकीय वादंग | Navarashtra (नवराष्ट्र)

Rahul Gandhi | राहुल गांधींचे श्रीकृष्णाच्या रुपातील पोस्टर व्हायरल; उत्तर प्रदेशातील बॅनरमुळे राजकीय वादंग | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राहुल गांधींचे श्रीकृष्णाच्या रुपातील पोस्टर व्हायरल; उत्तर प्रदेशातील बॅनरमुळे राजकीय वादंग

 कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी हे कृष्णाच्या रुपात दाखवण्यात आले असून महाभारतातील रथाप्रमाणे हे पोस्टर लावण्यात आले आहे

उत्तर प्रदेश : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी हे कृष्णाच्या रुपात दाखवण्यात आले असून महाभारतातील रथाप्रमाणे हे पोस्टर लावण्यात आले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. लवकरच ही यात्रा कानपूरमध्ये पोहचणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधींचे हे पोस्टर लागल्य़ामुळे नवा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने चांगलेच प्रस्त निर्माण केले आहे. त्यामध्येच अयोध्येमध्ये राममंदिर झाल्यामुळे भाजपची सकारात्मक बाजू आहे. अशातच आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. आज ही यात्रा उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे प्रवेश करणार आहे. यापूर्वी कानपूरमध्ये लागलेल्या पोस्टरने सर्वाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये महाभारतातील अर्जुन व भगवान कृष्ण यांचा युद्धभूमीवरील रथारुढ फोटो दाखवण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘भगवान कृष्ण’ आणि यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना ‘अर्जुन’ दाखवणारे पोस्टर लावले आहेत. या पोस्टर्समुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments