
मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणाऱ्या संस्थांमध्ये IIT भिलाई, IIT तिरुपती, IIT जम्मू, IIITDM कांचीपुरमचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS) कानपूर आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे दोन कॅम्पस – देवप्रयाग (उत्तराखंड) आणि आगरतळा (त्रिपुरा) येथे उभारले जाणार आहेत. यासोबतच तीन नवीन IIM चे उद्घाटनदेखील होईल. यात IIM जम्मू, IIM बोधगया आणि IIM विशाखापट्टणमचा समावेश आहे. याशिवाय, देशभरात केंद्रीय विद्यालय (KV) साठी 20 नवीन इमारती आणि 13 नवीन नवोदय विद्यालय (NV) इमारतींचे उद्घाटनदेखील पार पडणार आहे.







