Sunday, August 30, 2026
Homeसातारागोठयात मळीचा टँकर घुसल्याने तीन जर्सी गाई ठार : मोगराळे घाटाच्या पायथ्याशी

गोठयात मळीचा टँकर घुसल्याने तीन जर्सी गाई ठार : मोगराळे घाटाच्या पायथ्याशी

फलटण:दुधेबावी गावच्या हद्दीत मोगराळे घाटाच्या पायथ्याशी (ता. फलटण, जि. सातारा) शनिवारी रात्री २ वाजता मळीने भरलेल्या टँकरचालकाचे टँकरवरील (क्र. एमएच ०९ सीयु ८४५५) नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याकडेला असलेल्या गोठ्यात घुसला. या अपघातात गोठ्यातील तीन जर्सी गाई ठार झाल्या असून टँकरचालक किरकोळ जखमी झाला आहे.

या अपघात प्रकरणी टँकरचालक दीपक दिलीप शिंदे (रा. बलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

या अपघाताचा अधिक तपास पो.ना. कदम करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments