Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगकार्ला लेणीतील हे शिल्प पुढील प्रमाणे आहे.

कार्ला लेणीतील हे शिल्प पुढील प्रमाणे आहे.

कार्ला लेणीतील हे अतिशय महत्त्वपूर्ण शिल्प आहे, असीत मूनी यांनी सिध्दार्थ गौतम यांचे भविष्य वर्तविले होते की ते जर गृहस्थ जीवनात राहीले तर ते चक्रवर्ती सम्राट होती आणि जर त्यांनी गृहस्थ जीवन त्यागले सन्यस्त जीवन स्वीकारले तर ते सम्यक संबुध्द होतील, सिध्दार्थ गौतम हे गृहस्थ जीवन त्यागून सन्यस्त जीवन जगणे स्वीकारतात आणि बुध्दत्व प्राप्त करतात त्याला अनुसरून हे शिल्प आहे.

कार्ला लेणीतील हे शिल्प पुढील प्रमाणे आहे.

सम्यक संबुध्द धम्म चक्र प्रवर्तन मुद्रेत असून प्रलंबपाद अवस्थेत आहेत तर,ते इथे शास्ताच्या भूमिकेत आहेत व त्यांचे जे शासन आहे ते म्हणजे धम्म शासन असून ते सिंहासनावर बसले आहेत ते ज्या मंचकावर बसले आहेत त्याला सिंहासन म्हणतात का सिंहासन म्हणतात कारण निरखून जर आपण पाहीले तर खाली दोन्ही कोपर्‍यात दोन सिंह दिसत आहे तर मागचे दोन सिंह आपल्याला दिसत नाही , सम्यक संबुध्दांच्या सेवेत आपल्या शास्ताच्या सेवेत चौरी धारी पद्मपाणी व वज्रपाणी दिसत आहेत सम्यक संबुध्द दोन्ही बोद्धीसत्व हे कमल पुष्पावर आहेत त्याचे कारण कमल पुष्पाचे गुणधर्म म्हणजे ते चिखलात उगवत जरी असले तरी त्याला चिखल व पाण्याचा स्पर्श होत नाही तेच गुणधर्म सांकेतिक भाषेत इथे अधोरेखित केले आहे की सम्यक संबुध्दांना कोणत्याच प्रकाच्या “तृष्णा” स्पर्श करत नसून त्यांनी सर्व तृष्णांचे क्षय केले आहे हे प्रमाणीत करण्यासाठीच नेहमीप्रमाणे कमल पुष्पाचे इथे अंकन केले गेले आहे.
कमल पुष्पाला आधार तसेच स्वीकारणारे नागराजे खालच्या पातळीवर आहेत जे या भूमीचे आहेत म्हणून ते खालच्या पातळीवर आहेत.
कमल पुष्पाच्या खाली धम्म चक्र आहे, धम्म चक्र हे सतत गतीमान आहे फिरत आहे हे या शिल्पात उत्कीर्ण करण्यात आले आहे धम्म चक्र चपटे न दाखवता ते फुगीर दाखवण्यात आले फुगीर असून ते सतत गतीमान आहे ते फिरते आहे हे यातून स्थापित करण्यात आले आहे.
अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे मकर तोरणाच्या खाली दोन यक्ष आकाशातून शास्त्यासाठी चक्रवर्ती सम्राटा करीता मुकूट घेऊन येताना दिसत आहे हे अंकन करणारे एकमेव शिल्प फक्त कार्ला लेणीवर आहे.

सूरज रतन जगताप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments