Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशडायरेक्ट शिरच्छेदः एका हातात कोयता दुसऱ्या हातात... पत्नीची हत्या करून असा हायवेवर...

डायरेक्ट शिरच्छेदः एका हातात कोयता दुसऱ्या हातात… पत्नीची हत्या करून असा हायवेवर फिरला, पोलिसही चक्रावले

[ad_1]

Crime News Today: पती-पत्नीतील वाद नेहमीच होत असतात. मात्र, पती-पत्नीच्या क्षुल्लक वादातून धक्कादायक घटना घडली आहे. राजधानी लखनऊ येथील बाराबंकी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या केली. इतंकच नव्हे तर पत्नीचे मुंडके तो रस्त्यावर फिरत होता. हे धक्कादायक चित्र पाहून सर्वांच्या अंगावर भितीने काटा उभा राहिला होता. 

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील ही घटना घडली आहे. माथेफिरु पतीने त्याच्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. याचे कारण म्हणते पत्नीचे एका तरुणाशी अनैतिक संबंध होते, त्याच रागातून पतीने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधातून दोघांमध्ये वाद झाले होते. याच वादातून चिडलेल्या पतीने कोयत्याने वार करत पत्नीचे डोके धडावेगळे केले. तर, पत्नीचे मुंडके घेऊन तो रस्त्यावर फिरत होता. 

माथेफिरु पतीने एका हातात कोयता आणि एका हातात  पत्नीचे शिर घेऊन फिरत होता. स्थानिक लोकांनी या घटेनेचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पतीला अटक केले आहे. 

8 वर्षांपर्वी झाले होते लग्न 

बसारा गावात राहणाऱ्या अनिल कुमार याचे 8 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काहीच दिवसांत त्याच्या पत्नीचे एका युवकासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. या घटनेवरुन अनिल आणि त्याच्या पत्नीचे सतत वाद होत होते. याच कारणावरुन शुक्रवारी त्यांच्यात मोठे भांडण झाले. पत्नी-पत्नीतील वाद इतके विकोपाला गेले की चिडलेल्या पतीने घरात ठेवलेल्या कोयत्याने पत्नीची शिर धडावेगळे करत तिची हत्या केली. 

पत्नीची हत्या केल्यानंतर माथेफिरप पती हातात कोयता आणि पत्नीचे धड घेऊन कोतवाली पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होता. ही भयंकर दृष्य पाहून लोकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. स्थानिक लोकांनी अनिलचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. स्थानिक लोकांनी या पूर्ण घटनाक्रमाची फतेहपूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. या वादातून आरोपी अनिलने शुक्रवारी पत्नीची हत्या केली. पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा मुख्यालयात पाठवला आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments