Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशRajya Sabha Election 2024 | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; 28...

Rajya Sabha Election 2024 | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना संधी | Navarashtra (नवराष्ट्र)

Rajya Sabha Election 2024 | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना संधी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना संधी

राज्यसभा निवडणूक 2024 साठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाली असून 24 नवीन नावांची घोषणा यात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याची योजना तयार केली आहे.

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणूक 2024 साठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाली असून, 24 नवीन नावांची घोषणा यात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याची योजना तयार केली आहे. 56 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या खात्यात 28 जागा जाणार आहेत.

भाजपनेही या 28 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, उमेदवारांची यादी पाहिल्यावर 28 पैकी 24 नावे नव्या चेहऱ्यांची आहेत. तर चार जणांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जात असल्याचे दिसून येत आहे. 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला संख्याबळाच्या जोरावर 27 जागा सहज जिंकता येणार आहेत. उर्वरित एक जागा जिंकण्यासाठी ओडिशात बीजेडीची गरज आहे. 28 उमेदवारांपैकी ज्या चार उमेदवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जात आहे. त्यात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव, एल मुरुगन आणि भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते सुधांश त्रिवेदी राज्यसभेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments